पुणे : वाढत्या वयोमानानुसार हाडे कमकुवत होत असल्याचे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे हाडांवर परिणाम होत असल्याचे आढळून येत आहे. हाडांची ठिसूळता ही हाडांच्या घनतेवर अवलंबून असते. बदलत्या जीवनशैलीमुळे लहानमुलांपासून ते वयोवृध्दांमध्ये सध्या हाडांच्या समस्या दिसून येतात. या समस्या रोखण्याकरीता परिपूर्ण आहार व नियमीत व्यायाम गरजेचा आहे, असे मत बोरीकर हॉस्पिटलचे डॉ.मकरंद बोरीकर यांनी व्यक्त केले.
वारजे येथील बोरीकर मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हाडांची ठिसूळता तपासण्यासाठी मोफत तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.गुणेश भाटी यांसह 2 डॉक्टर्स व 16 जणांच्या टिमने सहभाग घेत नागरिकांची तपासणी केली. तब्बल 93 नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला.
डॉ.गुणेश भाटी म्हणाले, बदलत्या जीवनशैलीमुळे आहारामध्ये जंक फूडचे प्रमाण वाढत आहे. याशिवाय कॅल्शियमच्या कमतरतेमुळे मान, पाठ व इतर हाडांची दुखणी उद्भवत आहेत. तसेच अनेकदा थकवा आल्याचे दिसून येते. याकरीता नियमीत व्यायाम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी नागरिकांशी बोलताना सांगितले. हॉस्पिटलतर्फे विनामूल्य सल्ला मिळविण्याकरीता 020-25231001, 020-25231112 या क्रमांकवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.