भोसले यांनी धनकवडी परिसरातील नागरिकांसाठी खास दिवाळीचा मुहूर्त साधून ना नफा ना तोटा या धर्तीवर दिवाळी फराळाचे खाद्यपदार्थ विक्रीस ठेवले आहे. त्यांच्या खारी करंजीस नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या गृहउद्योगातर्फे भाजणी चकली , बेसन लाडू, शंकरपाळी , खजूर लाडू , करंजी , अनारसे , रवा लाडू, ओल्या नारळाची करंजी , आदी पदार्थ कमी दारात विक्रीस ठेवण्यात आले आहेत.
धनकवडी , कात्रज , आंबेगाव , नर्हे आंबेगाव आदी परिसरातील नागरिक हे पदार्थ खरेदी करण्यासाठी येत आहेत.
यासंदर्भात बोलताना भोसले यांनी सांगितले कि , अनेक महिलांना नोकरी व अन्य कामामुळे घरी दिवाळीचे खाद्यपदार्थ तयार करणे अवघड असते. त्यामुळे त्यांना खास घरी तयार केलेले फराळाचे पदार्थ दिवाळीसाठी हवे असतात . हे लक्षात घेऊन आम्ही बचतगटाच्या महिलांच्या मदतीने घरीच फराळाचे पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली. सध्या मशीनवरही हे पदार्थ तयार करून मिळतात . पण आम्ही नागरिकांची गरज व मागणी लक्षात ठेवून खास घरीच पदार्थ तयार केले. तसेच माझ्याकडे काम करण्यास येत असलेल्या महिलांना या माध्यमातून रोजगार मिळेल हे सुद्धा मी ठरवले . सध्या आम्ही 8-10 महिलांच्या मदतीने खाद्यपदार्थ तयार विक्री करत आहोत.
या उपक्रमास मनीषा देशमुख , चेतना तांबे, उमा गणगोटे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळत आहे.