पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेत दिवाळी पहाट कार्यक‘माचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक‘मात विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी विविध कलांचे सादरीकरण केले. संगीत शिक्षक अजय पराड यांच्या रागावर चित्रकला शिक्षक संदीप माळी यांनी चित्र काढून चित्रकला-संगीताचा अनोखा संगम साधला. पार्थ बापट या विद्यार्थ्याने देशभक्तीपर गीत सादर केले. प्रशांत तेलंग या विद्यार्थ्याने वसूबारसची माहिती सांगितली. श्रेयस कोंडे यांने गिटार वादन केले. अतुल दळवी या शिक्षकेतर कर्मचार्याने नृत्य व गणपत लागी यांनी अभिनय करुन दाखविला. यावेळी भव्य रांगोळी रेखाटन करण्यात आले होते. एक पणती सैनिकांसाठी या उपक‘मांतर्गत सैनिकांना अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली दीप्ती डोळै, स्नेहल कुलकर्णी, रजनी कोलते, अर्चना पंच, चंद्रशेखर कोष्टी यांनी संयोजन केले.