दिवाळी पाडवासंध्येला होणार ८ हजार पणत्यांचा लखलखाट

October 17th, 2017 Posted In: Pune Express

Team TNV

– शिवजयंती महोत्सव समितीतर्फे एसएसपीएमएस शाळेतील श्री शिवछत्रपती पुतळ्यासमोर दीपोत्सव
 
पुणे : शिवजयंती महोत्सव समितीतर्फे शिवशके 344, दिवाळी पाडवा शुक्रवार 20 आॅक्टोबर 2017 रोजी संध्याकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज दिपोत्सव 2017 पर्व 6 वेचे आयोजन श्री शिवछत्रपती पुतळा, एसएसपीएमएस शाळा, शिवाजी महाराज चौक, शिवाजी नगरे येथे करण्यात आले आहे. दिपोत्सवाचे उद््घाटन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, मंगोलीया येथे शरीरसौष्ठव स्पर्धेत मीस्टर वर्ल्ड किताब विजेते महेंद्र चव्हाण तसेच शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा 2017 मध्ये सहभागी झालेल्या स्वराज्य घराण्यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती समितीचे संकल्पक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली. 
शिवछत्रपतींचा हा जगातील पहिला भव्य अश्वारुढ पुतळा तसेच एकसंघ ओतीव काम केलेला एकमेव पुतळा आहे. राजर्षि शाहुछत्रपती पुत्र श्रीमंत राजाराम छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली 16 जुन 1928 साली या पुतळ्याचे अनावरण झाले होते. पुतळ्याचे यंदा 90 व्या वर्षात पदार्पण झाले आहे. पुतळयाचे वजन तब्बल 8000 किलो आहे. त्यामुळे किलोमागे एक पणती अशा 8 हजार पारंपरिक पणत्यांची मानवंदना देण्यात येणार आहे. 
समितीतर्फे शिवजयंतीला आयोजित करण्यात आलेल्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात सहभागी झालेल्या सरसेनापती वीर बाजी पासलकर, मानाचे पहिले सरदार कानोजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनोबत सरसेनापती येसाजी कंक, सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्वराज्यघराण्यांचा सत्कार सन्मानचिन्ह देऊन होणार आहे. तसेच यंदा या सोहळ्यात सहभागी झालेल्या गरुड, घारे, काटे, निंबाळकर, संत तुकाराम महाराज भक्तीशक्ती, महाडीक आणि कोंढाळकर या स्वराज्यघराण्यांचा सन्मान केला जाणार आहे. अमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र कंक, सचिन पायगुडे, गिरीश गायकवाड, दिग्विजय जेधे, दीपक घुले, महेश मालुसरे, समीर जाधवराव, निलेश जेधे, अनिल पवार, किरण देसाई,  गोपी पवार, मयुरेश दळवी यांसह असंख्य स्वराज्यबांधवांनी केले आहे. तरी पुणेकरांनी या अनोख्या नेत्रदिपक दिपोत्सव मानवंदनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे. 

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions