पुणे – ’प्लास्टिक कचरा मुक्त मुळशी ‘ अभियानास सोमवारी बेलावडे ( ता. मुळशी ) येथे प्रारंभ करण्यात आला. लायन्स क्लब ऑफ पुणे कोथरुड ‘ , एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया या संस्थांनी या अभियानासाठी पुढाकार घेतला आहे. ‘लायन्स क्लब’ आणि ’एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया’ च्या वतीने प्लास्टिक समस्या सोडविण्यासाठी प्लास्टिक कचऱ्याला ५ रुपये हमी भाव देण्यात येणार आहे.
‘लायन्स क्लब’ चे माजी प्रांतपाल फत्तेचंद रांका, लायन्स क्लब पुणे कोथरुड चे अध्यक्ष नागेश चव्हाण, सरपंच कल्पना जंगम, गट विकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील, एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया’ चे अध्यक्ष नीलेश इनामदार, प्रकल्प प्रसार प्रमुख ललीत राठी यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियानास प्रारंभ झाला.
प्लास्टिक वापराबद्दल प्रबोधन, प्लास्टिक कचरा संकलन, प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया अशी या अभियानाची वैशिष्टये आहेत. सामुहिक प्रयत्नातून हा तालुका देशातील पहिला प्लास्टिक कचरामुक्त तालुका करण्याचा निर्धार या कार्यक्रमात करण्यात आला. फत्तेचंद रांका यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
’लायन्स क्लब कोथरूड’चे काशीनाथ येनपुरे, माजी सरपंच धैर्यशील ढमाले, माजी सभापती बाबा कंधारे, अभय शास्त्री इत्यादी उपस्थित होते.