पुणे – साखर कारखान्याने निर्मित केलेल्या मद्याच्या ब्रॅण्डला महिलेचे नाव द्या म्हणजे अधिक खप होईल ,असे म्हणणाऱ्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी महिलावर्गाचा अपमान केला असून त्यांनी तातडीने माफी मागावी अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस च्या खासदार वंदना चव्हाण यांनी केली आहे .
आज पुण्यात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी ही मागणी केली आहे .
खप वाढण्यासाठी तंबाखू आणि मद्य उत्पादनांना महिलांची नावे दिली जातात ,त्यामुळे सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या मद्यनिर्मिती विभागाच्या मद्याच्या ब्रॅण्डला महिलेचे नाव द्या असे गिरीश महाजन यांनी भाषणात म्हटले होते . या वक्तव्याचा खासदार वंदना चव्हाण यांनी निषेध केला आहे . गिरीश महाजन यांचे वक्तव्य समस्त महिला वर्गाचा अपमान करणारे आहे ,आणि मद्यसेवनाचा अनावश्यक प्रसार करणारे आहे . मंत्री पदावरून असे बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या गिरीश महाजन यांनी माफी मागावी ‘असे वंदना चव्हाण यांनी म्हटले आहे
आपण जलसंपदा मंत्री आहोत ,की मद्यप्रचार मंत्री याचा त्यांनी विचार करावा असेही खासदार चव्हाण यांनी या पत्रकात म्हटले आहे