पुणे – नोटबंदी ला 8 नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. सरकारच्या या चुकीच्या निर्णयाने सर्वसामान्य जनतेची खूप गैरसोय झाली असून, देशाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार ,खासदार सुप्रिया सुळे ,दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने पुण्यात मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार वंदना चव्हाण यांनी दिली
हा मोर्चा दिनांक ८ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी १०. ३० होणार आहे. महात्मा फुले मंडई येथील टिळक पुतळ्यापासून मोर्च्यास सुरुवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे सांगता होईल. मोर्च्याची सांगता आयुक्त सौरभ राव यांना निवेदन देऊन होणार आहे.
‘नोटबंदी निर्णयानंतरच्या अनियोजित अंमलबजावणी मुळे भारतीय अर्थव्यवस्था कोलमडली असून सामान्य नागरिकांना याचा अधिक त्रास झाला . आर्थिक आणीबाणीमुळे सामाजिक ,आर्थिक व्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला . याचा निषेध करण्यासाठी या मोर्चाचे नियोजन करण्यात येत आहे ,असे खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितले .
नोटबंदीमुळे काळा पैसा बाहेर येईल आणि दहशतवादाचे कंबरडे मोडेल ,हि आशाही फोल ठरली . व्यापारी ,उद्योग आणि छोटे व्यावसायिक यांचे कंबरडे मोडले . अर्थकारणाचे अज्ञान आणि मनमानी निर्णय घेण्याची वृत्ती यामुळे हा निर्णय घेतला गेला . या सगळ्याचा निषेध करण्यासाठी तरी जास्तीत जास्त संख्येने कार्यकर्त्यांनी या मोर्च्यात सहभागी व्हावे असे आवाहन खासदार वंदना चव्हाण यांनी केले आहे