‘ऑनर युवर डॉक्टर ‘ अभियानास प्रारंभ 

November 6th, 2017 Posted In: Pune Express

Team TNV

पुणे – सेवाभाव​,​आदर असलेल्या वैद्यकीय व्यवसायाबद्दल समाजाने आपला दृष्टिकोन सकारात्मक करावा यासाठी ‘ऑनर ​युवर डॉक्टर ‘ या अभियानाला शनिवारी प्रारंभ झाला, बालरोगतज्ज्ञांच्या परिषदेत डेल क्युअर लाईफ सायन्सेस चे व्यवस्थापकीय संचालक पी के पाठक यांच्या हस्ते अभियानास प्रारंभ झाला . अनुभव कथन ,पोष्टर सादरीकरण ,गटचर्चा या माध्यमातून हे अभियान होणार आहे . 
 
 यावेळी बोलतांना पी के पाठक म्हणाले ,’डॉक्टरांवर होणारे हल्ले चिंताजनक आहेत . वैद्यकीय व्यवसाय हा जीवनदायी आहे . समाजाची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांबद्दल आपली मानसिकता सकारात्मक असली पाहिजे . 
 
​’ऑनर युवर डॉक्टर ‘ अभियानातून आम्ही वैद्यकीय व्यवसायाची सकारात्मक बाजू समोर आणणार आहोत . समाजाने केवळ नकारात्मक बाजू न पाहता ,सकारात्मक गोष्टींवर विश्वास ठेवला पाहिजे . आरोग्य वाढावे आणि आयुर्मान वाढावे यासाठी कार्यरत वैद्यकीय व्यावसायिकांना समाज घटकांकडून भीती वाटणार नाही ,याची काळजी घेतली पाहिजे ‘ असेही ते म्हणाले.
 
जे डब्ल्यू मेरियट येथे झालेल्या या वैद्यकीय परिषदेला देशातून शेकडो डॉक्टर उपस्थित होते.
 

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions