राजकारणातला पडद्यामागचा जादूगार
विवेक ताम्हणकर
काही माणसं अशी असतात की त्यांच्याकडे कोणताही प्रश्न घेऊन जा त्याच्यावर त्यांच्याकडे उत्तर हे असतच. त्यांना समोर व्यक्ती कोण आहे या पेक्षा त्या व्यक्तीची अडचण दूर करणे फार महत्वाचे वाटून जाते. कांकवलीतील वागदे गावचा समीर सावंत हा तरुण त्याच जातकुळीतला. तो जे करतो ते अगदी मनापासून असत. त्यात कोणताही लपवाछपवीचा किंवा मी खूप काही करतो असा आव नसतो. म्हणुनच कदाचित तो सर्वाचाच आवडता मित्र होऊन जातो.
समीरच्या घराला तसा वाडीलांपासून राजकीय वारस. रमाकांत सावंत हे निस्वार्थी मनाचे राजकारणी. आपल्या तत्त्वांशी बांधील रहात त्यांनी नेहमीच आपलं राजकीय आयुष्य गरीब लोकांच्या कल्याणासाठी खर्ची घातलं. आपली मुले, पत्नीययांच्यापेक्षा लोककल्याणाचे त्यांना भलतेच वेड. अनेक पदे भूषवली मात्र त्या पदांचे मोठेपण त्यांनी कधीच अंगावर मिरवले नाही .
समीरचे वडील हीच त्याच्या घरची श्रीमंती होती. वडील अचानक गेले आणि जे अनेकांच्या वाट्याला आले ते समिरच्याही वाट्याला आले. जवळच्या अनेकांनी पाठ फिरवली. पूर्वी वडिलांच्या मागे पुढे असणारे विचारेनशेत झाले. प्रसंगात आपले आणि परके कळतात, हा अनुभव खूपच वेदनादायक होता. अजून खांदा मळायचा होता, त्यावर वडील अचानक जबाबदारी देऊन गेले होते. घरातला मोठा मुलगा या नात्याने समीरला जबाबदारी उचलणे भाग होते , अखेर त्याने ती पेलली. आईला आधार देत तिच्याच साथीने घराची श्रीमंती पुन्हा एकदा उभी केली. नवे मित्र जोडले, नव्याने सारे काही करताना लोकसेवेचा वडिलांचा पिंडही जोपासला आहे. समीरच्या खंबीरपणावर उभे राहिलेले हे कुटुंब आज खऱ्या अर्थाने अनेकांचे कुटुंब बनले आहे. समीरचा धाकटा भाऊ सरपंच म्हणून गावाच्या प्रगतीचा रथ वडिलांच्या ताकदीनेच हाकतो आहे.
समीरला साथ मिळाली ती सायली बहिणींची, वहिनीदेखील या कुटुंबात आल्या आणि समीर प्रमाणे सर्वांच्या बनून गेल्या. पतीच्या विचारला पत्नीची साथ मिळाली, अर्थात या साथसंगतीत वाहिणींचेही नेतृत्व झळाळून गेले. आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत वहिनी महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती म्हणून यशस्वी कारभार हाकत आहेत.
भाऊ आणि पत्नी यांच्या कारभारात समीरचा हस्तक्षेप नसतो मात्र वडिलांनी घालून दिलेल्या मार्गावर ही लोक चालतात का याकडे मात्र लक्ष असतो. लोकांची कामे वेळेत व्हावीत, कोणत्याही पदाचा किंवा सोईचा गैरवापर होऊ नये हा वडिलांचा वकुब समीरने आजही जोपासलाय याच कौतुक आहे.
स्वतःला वाडीलांप्रमाणे अनेक पदे मिळवणे सहज शक्य असताना ससमिर त्या पासून मात्र लांबच राहिला. कुटुंब सवरताना अनेकांच्या कुटुंबाचा आधार बनण्यात त्याने धन्यता मानली . त्या माणसाकडे कोणीही जाओ त्याला आपल्या परीने तो मदत करणारच. अशा या राजकारणातील पडद्यामागचा जादूगार आणि सामाजिक भावना जोपासणाऱ्या या आमच्या सामान्य मित्राचा आज वाढदिवस, त्याच्या वयात आणखीन एका वर्षाची भर पडली. हे वाढत वय त्याला दीर्घायुषी बनऊदे आणि लोकसेवेची त्याची भावना , कार्य आणखीन वरुद्दीगत होउदे ही मनोकामना……..