माहिती आणि जनसंपर्क विभाग हवाच कशाला

एस. एम. देशमुख मुख्यमंत्र्यांचा सहभाग असलेला ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’,’जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ हे तीन कार्यक्रम सरकारच्यावतीने महिन्यातून तीन-चार वेळा दूरदर्शनवरून सादर केले जातात.या सर्व कार्यक्रमांची निर्मिती,प्रसारण आणि कार्यक्रमाच्या वृत्तपत्रांमधील जाहिरातीसाठी सरकार २०१७-२०१८ या काळात तब्बल ४ कोटी ४५ लाख १२ हजार ८०० रूपये खर्च कऱणार आहे.त्यावरून सध्या वादंग माजलं आहे.अनेक सुजाण नागरिकांना असं वाटतं की,सरकारनं अशी जाहिरातबाजी कऱण्याची…

READ more..

बाल वयात वाचनाचे संस्कार आणि आम्ही

सुरेश शामराव ठाकूर ‘मुलांनो, ग्रंथ चावायचे नसतात रे, ग्रंथ वाचायचे असतात आणि ग्रंथ पोटात सुद्धा ठेवायचे नसतात. ते माणसाच्या ओठात हवे.’ काका काय बोलत होते त्याचा अर्थ तेवढासा आम्हाला त्यावेळी समजत नव्हता. पण ते प्रेमळपणाने बोलत होते. त्याचा आवाज आजोबांच्या प्रेमासारखा ओथंबलेला होता. म्हणून आम्हा दोघांना हायसे वाटले. आमच्या शालेय जीवनात आमच्या आचरे गावात वीज नव्हती आणि त्यामुळेच आम्हाला लहानपणीच…

READ more..

बंदर भ्रमंती पर्यटनाचे नवे दालन

टिम “येवा कोकणात” इतिहासकाळी कोकण किनारी ८४ बंदराचा थाट होता. कालौघात हि बंदरे नाहीशी झाली किंवा कार्यरत नसली तरी त्या इतिहासाचा अनुभव आजदेखील कोकणात घेता येतो. रात्रीच्या प्रकाशात बंदरापासून दूर उभी राहणारी बोट, लाटांच्या वरखाली लयीबरोबर पडाव -खपाटा -मचव्यातून उतरलेले प्रवासी आणि गावकाडावच्या प्रवासाची आणि बंदराच्या इतिहासाची यादगार अनुभूती घ्यायची असेल तर जुन्या नावाड्यांना भेटायला बंदरावरच गेलेच पाहिजे. बंदर भटकंती…

READ more..

नेताजी, आझाद हिंद आणि आजचा भारत

अभिषेक शरद माळी, पुणे २३ जानेवारी २०१८ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२१ वी जयंती आपण साजरी केली. आजही नेताजींबद्दल जनतेच्या मनात तितकेच प्रेम आणि आदर आहे. स्वातंत्र्य लढ्याच्या कालखंडात उदयास आलेल्या एकाहून एक श्रेष्ठ नेत्यांपैकी काही मोजक्या नेत्यांनी प्रभावीपणे सामाजिक, राजकीय आणि वैचारिक मांडणी केलेली आपल्याला दिसते. यांपैकी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरदेखील ज्यांचे विचार आजही निर्णयप्रक्रिया आणि वैचारिक जडणघडणीत…

READ more..

तरच शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबतील

टिम “येवा कोकणात” रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी होऊ लागला. शेती उत्पन्नात घट आणि शेती उत्पादन खर्च वाढू लागला. आधुनिक बियाण्यांमुळे पारंपरिक बियाण्यांच्या जाती नष्ट होऊ लागल्या. शेतक-यांनी स्वत:च्या तसेच राष्ट्राच्या हिताचा विचार करून सेंद्रीय शेती पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आणि सर्वाच्याच फायद्याचे आहे. स्वातंत्र्यानंतर आधुनिक पद्धतीने शेती उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न झाला, परंतु मागील दहा-पंधरा वर्षामध्ये देशात शेतक-यांच्या आत्महत्या…

READ more..

इतिहासाने समृद्ध भूमी “कोकण”

बाळा कदम दक्षिण रत्नागिरीमधील सह्याद्री पर्यटनाला जाताना मराठी राज्यासाठी प्राणाची पर्वा न करता निधडय़ा छातीने लढणा-या छत्रपती संभाजी राजेंच्या संगमेश्वर कसबा येथे संभाजी स्तंभाला नतमस्तक होऊन शिवशंभूचे अधिष्ठान असलेले मार्लेश्वर, सुरक्षित आंबा घाट, अणुस्कुरा घाट, पांडवकालीन लेणी, उगवाई मंदिर, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर गाव कोलधे आणि सासर जवळच्याच नेवाळकर कुटुंबातील कोटगावमध्ये आहे ते पाहिले. राजापूरची गंगा, धुतपापेश्वर, उन्हाळा…

READ more..

आंगणेवाडी यात्रा आणि श्रद्धेचा बाजार

टिम “येवा कोकणात” कोकणात जत्रांची कमतरता नाही. वर्षाच्या ठरावीक तिथीला प्रत्येक गावात जत्रा भरते. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख कुठल्या पंचागात अथवा कॅलेंडरमध्ये सापडणार नाही. भक्ताच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी तिची ख्याती आहे. निवडणुकांच्या अल्याड-पल्याड आलेली ही जत्रा कधी मतदार मिळवून देणारी घाऊक व्होट बँक असते तर काहींना कार्यकर्त्यांचा नेता बनवणारी वाटते….

READ more..

‘बाल्या नाच’ कोकणी लोककला

टिम “येवा कोकणात” कोकण प्रांतातील निसर्गसौंदर्याप्रमाणे तेथील लोककलाही मनमोहक आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘जाखडी नृत्य’. ‘जाखडी’ मधील खडी म्हणजे उभे राहणे. हा नाच उभ्या.ने केला जातो, म्हडणून त्या स ‘जाखडी’ असे म्हसटले जाते. जाखडीचा आणखी एक अर्थ होतो – ‘जखडणे’. ‘जाखडी’मध्ये नृत्य‘ करणार्यांनची शृंखला तयार केली जाते. जाखडी नृत्यास ‘बाल्या नाच’ असेही म्ह टले जाते. मुंबई त ग्रामीण भागातील…

READ more..

रत्नागिरीतील ग्रामीण भागाचे सौभाग्य उजळले 

रत्नागिरी (प्रतिनिधी ) ‘सौभाग्य योजना’ अर्थात मागेल त्याला वीज जोडणी देण्यात येणार आहे. ही योजना जाहीर झाल्यापासून रत्नागिरी जिल्ह्यात ३००  वीज जोडण्या देण्यात आल्या. पंडित दीनदयाळ यांच्या नावाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सौभाग्य’ ही योजना जाहीर केली आहे. देशातल्या महिलांना केंद्रस्थानी ठेवून केंद्र सरकारने ‘सौभाग्य’ योजना जाहीर केली आहे. या योजनेंंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत वीज कनेक्शन देण्यात येत आहेत. या…

READ more..

आगीत शेकडो एकरातील बागायती खाक 

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी ) डिंगणे-धनगरवाडी येथे लागलेल्या आगीत सुमारे साडेतीनशे एकरातील बागायती जळून खाक झाली. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास लागलेली ही आग डिंगणे-धनगरवाडी येथून मोरगाव व डेगवे येथील बागायतीमध्येही शिरली. आग विझविण्यासाठी डिंगणे गाव एकवटला. त्यांच्या मदतीला शेजारील गावांतील ग्रामस्थही सरसावले. मात्र सकाळी साडेअकरा वाजता कळवूनही आपत्ती व्यवस्थापनकडून मात्र कोणतीच उपाययोजना करण्यात आली नाही. अग्निशमन बंब दुपारी तीन वाजता दाखल…

READ more..

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions