श्री गणपतीचे स्वरूप आणि त्याचे रहस्य

चंद्रशेखर तेली, जामसंडे, तालुका देवगड   प्रत्येक मंगलकार्यात श्री गणपतीचे प्रथम पूजन करूनच सुरुवात केली जाते. यावेळी पूजनाच्या थाळीत मंगलस्वरूप गणपतींचे स्वस्तिक चिन्हांचे रेखाटन करून ,त्याच्या आजूबाजूला म्हणजे डाव्या व उजव्या बाजूला दोन दोन उभ्या रेषा काढल्या जातात. स्वस्तिक चिन्ह हे गणपतीचे स्वरूप आहे तर त्याच्या दोन्ही बाजूला ज्या उभ्या रेषा काढल्या जातात त्या गणपतींच्या भार्यास्वरूप असलेल्या सिद्धी -बुद्धी आहेत. श्री…

READ more..

दोन कान दोन हात, बाप्पा करी संकटावर मात: कथा रेडीच्या द्विभुज गणपतीची

शशांक मराठे, वेंगुर्ला   कोकण किनारच्या जलमार्गातील बंदर म्हणून रेडी सर्वदूर ज्ञात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्याच्या दक्षिणेस समुद्र किनारपट्टीला लागून हे गाव वसलेले आहे. ‘सौंदर्य हे पाहणा-याच्या नजरेत असतं’ अशा अर्थाची एक म्हण आहे. मात्र रेडी  परिसर आपल्या नैसर्गिक अमूल्य अशा ठेव्यामुळे पाहणा-याच्या नजरेला सौंदर्याचे निराळेच परिणाम देतो. हिरवेगर्द माडांचे बन, लाल माती, गरजणारा दर्या आणि रुपेरी वाळू यांचं लेणं…

READ more..

गणपतीपुळ्याचा गणपती, त्याची देशभर ख्याती

जे. डी. पराडकर   कोकणातील रत्नागिरी जिह्यातील गणपतीपुळ्याचे गणेशस्थानाचा इतिहास मुद्गल पुराणादी प्राचीन वाङमयात पश्चिमद्वार देवता या नावाने आहे.भारताच्या आठ दिशांत आठ द्वार देवता आहे. त्यापैकी गणपतीपुळ्यातील देवता ही पश्चिमद्वार देवता आहेअसे मानले जाते. मोगलाईच्या काळात  सुमारे इ.स. १६०० च्या पूर्वी  आज ज्या ठिकाणी स्वयंभू गणेश मंदिर आहे, त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी केवड्याचे बन होते. त्या ठिकाणी बाळंभटजी भिडे हे ब्राह्मण…

READ more..

माझ्या आठवणीतलं लालबाग आणि लालबागचा गणेशोत्सव..

नितीन साळुंखे (९३२१८११०९१)   (माझं आजोळ लालबागचं. सुरुवातीची मुंबई कोकणातून उतरली ती भाऊच्या धक्क्यावर आणि मुंबैची नंतरची पिढी जन्मली ती परळच्या वाडीयात. माझा जन्मही वाडीयाचाच. पुढं जे काही लालबाग आणि लालबागेतल्या सणांचं वर्णन केलंय, ते माझ्या लहानपणी आई-मामाचं बोट धरून फिरताना मला त्यावेळी जे दिसलं आणि त्या वयात मला त्याचं जे आकलन झालं, तसंच लिहायचा प्रयत्न केलाय. आता हे लिहीताना मी…

READ more..

बोलावा गणेश, पहावा गणेश, आठवावा गणेश कोकण घरीचा 

श्रावणातल्या रिमझिम सरी भक्ती भावाने भरती मनाच्या घागरी भाद्रपदातील मंगल समई आली गणपती बाप्पाची स्वारी सजले मोदकाचे ताट, दिवा तेजोमय वात चौघडा गरजे, टाळ मृदंग वाजे गाती गुणगान त्याचे कोकणच्या घरोघरी सुखाचीही बरसात सण वरसाचा करी……i   श्रावण महिना संपला कि भाद्रपद घेऊन येतो ती गणरायाच्या आगमनाची शुभ वार्ता आणि कोकणात अमाप उत्साहात साजरा करण्यात येणारा सण म्हणजे गणेश चतुर्थी. ‘गणेश चतुर्थी’ या दोन शब्दांनीच कोकणी माणसाच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह भरभरून…

READ more..

गणाचा स्वामी

जान्हवी पराग जोशी   गणपती किंवा गणेश म्हणजे गणाचा स्वामी. गण म्हणजे समुदाय अथवा जमात. ब्रह्मणस्पती या देवाला ऋग्वेदात ‘गणपति’ हे विशेषण वरील अर्थी योजले आहे. ब्रह्मणस्पती हा स्वतंत्र देव इंद्रादिकांसारखा ऋग्वेदात वर्णिला आहे. वेदांच्या संहिता व ब्राह्मणग्रंथ यांमध्ये गणपती ही स्वतंत्र देवता म्हणून कोठेही निर्देशिलेली नाही. गणपतीच्या मूर्तीचे वर्णन, ‘तत्पुरुष’, ‘वक्रतुंड’ व ‘दंति’ या विशेषणांनी मैत्रायणी संहितेत आणि तैत्तिरीय आरण्यकातील…

READ more..

दक्षिणकाशीतील अनोखा गणेशोत्सव: येथे बाप्पाला देतात पंढरपुरी भत्ता

कुलकर्णी सर, पंढरपूर महाराष्ट्राची दक्षिणकाशी असणा-या पंढरीत कायमच ज्ञानोबा- तुकोबांचा गजर  असतो. मात्र याच पंढरीत भाप्रदपदांच्या दहा दिवसामधे अर्थात गणेशोत्सवामधे बाप्पांच्या गजरांची एक आगळीच झालर ही निर्माण झालेली असते. यामधे विठठल मंदिरातील देखिल गणेशोत्सवाची मोठया प्रमाणावर धुम असतेच. याशिवाय शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळे  भागवत धर्माची पताका घेउन गणेशोत्सव साजरा करताना दिसून येतात. अशाच काहीशा आगळया पंढरीच्या गणेशोत्सवांचा एक आढावा विठठल…

READ more..

प्रसंगात धावणारा पालीचा बल्लाळेश्वर

अमोलराजे बांदल-पाटील, रायगड रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यातील पाली हे गाव प्रसिद्ध आहे ते बल्लाळेश्वराच्या मंदिरामुळे, अष्टविनायकांपैकी  एक असलेल्या या मंदिराला पौराणिक इतिहास तर आहेच शिवाय हे भाविकांचे श्रद्धा स्थान आहे. बल्लाळेश्वराबाबत कृतयुगातील एक कथा सांगितली जाते.  गणेश पुराण उपासना खंड अध्याय २२ मध्ये “सिंधुदेशेडती विख्याता पल्लीनाम्ना भवत्पुरी” असा ”पाली” गावचा अर्थात पल्लीपुराचा उल्लेख सापडतो त्याच पल्लीपुरातील ही कथा बल्लाळेश्वराचे महत्व…

READ more..

सिद्धिविनायक महागणपती टीटवाळा

प्रियांका अहेर, नवी मुंबई   दुर्वास ऋषींचे यथायोग्य स्वागत न केल्यामुळे शकुंतलेला शाप मिळाला आणि राजा दुष्यंताला शकुंतलेचा विसर पडला. उत्साहाने पतीगृही गेलेली नवीन शकुंतला त्यामुळे आल्या पावली परत फिरली. कण्व ऋषींकडे परत आलेल्या या शकुंतलेने गणपतीची आराधना केली आणि दुष्यंताला सारे काही आठवले. शकुंतलेला तिचे प्रेम परत मिळवून देणारा गणपती म्हणजेच टिटवाळ्याचा महागणपती. टिटवाळ्याचा महागणपती! महाराष्ट्रातल्या अष्टविनायकांप्रमाणेच हे श्रीगणपती क्षेत्रही प्रसिद्ध…

READ more..

भाषेचा सामर्थ्य आणि नव्या वाटांचो शोध

विवेक ताम्हणकर   कारवार, गोमांतक अगदी पुढे रत्नागिरीपर्यंतच्या भागात बोलल्या जाणाऱ्या भाषेक “कोंकणी” असा म्हटला जात हूता. पुढे गोया  येगळा राज्य झाला आणि कोंकणीक गोयाची राज्य भाषा म्हणान मान मिळालो. पण या काळातंय सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत जी भाषा बोलली जात हूती ती कोकणीपेक्षा थोडी येगळीच हूती. पुढे भाषेच्या जाणकारांनी तिका ‘कुडाळी’ असा नाव दिल्यानी. पण या भाषेची मालवणी म्हणान आज पुऱ्या…

READ more..

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions