पुणे
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेने रामचंद्र दत्तात्रय प्रतिष्ठानच्या सहकार्याने आयोजि केलेल्या ‘शताब्दी आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत’ मा. स. गोळवलकर शाळेच्या जान्हवी कुलकर्णी हिने प्रथम क‘मांक मिळविला.
वेधा गुमास्ते (डीईएस प्रायमरी) आणि पार्थ सांगळे (अभिनव विद्यालय) यांनी दुसरा व तिसरा क‘मांक मिळविला. वरद पवार व राधा जोशी (भावे हायस्कूल) आणि धैर्यशील जाधव (नवीन मराठी शाळा) यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके मिळविली.
स्वदेशी चळवळीतील आमचा सहभाग, श्यामची आई संस्काराचा ठेवा, आम्हाला हवा आई-बाबांचा वेळ, स्वच्छतेकडून समृध्दीकडे असे स्पर्धेसाठी विषय होते. १४ शाळांतील २४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मंदार कुलकर्णी, मेधा कुलकर्णी, सुनिता आगाशे यांनी परीक्षक म्हणून काम केले.
सामाजिक कार्यकर्त्या ऍड स्वाती यादवाडकर यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. शाला समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील भंडगे, डॉ. सविता केळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मु‘याध्यापिका कल्पना वाघ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अर्चना देव यांनी सूत्रसंचालन केले. वैशाली आजबे यांनी परिचय करून दिला. भाग्यश्री हजारे यांनी आभार मानले.