पुणे – ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एजुकेशन सोसायटी’च्या ‘आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालया’च्या ‘मायक्रोबायोलॉजि’ विभागाच्या वतीने दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
‘इंजनिऊस ट्रेंड्स इन लाइफ सायन्सेस’ (INGENIOUS TRENDS IN LIFE SCIENCES) या विषयावर ही कार्यशाळा दिनांक 6 आणि 7 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या कार्यशाळेचे उदघाटन शुक्रवार, 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता डॉ. पी .के.ढाकेफाळकर यांच्या हस्ते होणार आहे. हा कर्यक्रम डॉ ए आर शेख असेम्ब्ली हॉल मध्ये होईल, अशी माहिती कार्यशाळा समन्वयक गौरी देवस्थळे यांनी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहयोगाने हि परिषद आयोजित केली आहे . भूतलावरील जीवंत प्राणांच्या आणि त्यांची परिसंस्था, पर्यावरणाचे भवितव्य या विषयावर या कार्यशाळेत चर्चा होणार आहे. तसेच संशोधनपर निबंध सादर होणार आहेत. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शैला बुटवाला, मायक्रोबायॉलॉजि विभाग प्रमुख डॉ . देविप्रिया मुजुमदार, उपथित राहणार आहे.