पुणे – ‘आयोध्या येथील रामजन्मभूमी व बाबरी मश्जिद च्या विवादास्पद समस्येला आंतरधर्मीय संवादाच्या माध्यमातून सोडविणे आवश्यक’ या विषयाला अनुसरून डॉ. विश्वनाथ कराड एमआइटी वर्ल्ड पीस यूनिवर्सिटी तर्फे गांधी जयंतीचे (2 आक्टोबर ) औचित्य साधून नवी दिल्ली येथे एक दिवसीय राष्ट्रीय गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व नामांकित व्यक्ती या परिषदेमध्ये सहभागी होणार असून या विषयावर योग्य ते समाधान शोधण्याचा प्रयत्न करतील, अशी माहिती माईर्स एमआयटीचे सचिव प्रा. डॉ. मंगेश तु. कराड व कार्यकारी संचालिका प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
दिल्लीमध्ये आयोजीत या पत्रकार परिषदेस नालंदा युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. विजय भटकर , अयोध्या रामजन्मभूमी चे पूर्वाध्यक्ष व माजी खासदार डॉ. रामविलास वेदांती, वरिष्ठ पत्रकार डॉ. वेदप्रताप वैदिक, भारतीय जनता पक्षाचे राष्टृईय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, माजी केंद्रीयमंत्री आरिफ मोहम्मद खान, नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. नरेंद्र जाधव, चाणक्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी, सांची विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. यज्ञेश्वर शास्त्री, मुस्लीम विचारवंत शेख बशीर अहमद बियाबानी, ज्यू विचारवंत इजिकेल आएजॅक मळेकर आदी विचारवंत सहभागी होतील.
या परिषदेमध्ये हिंदू धर्मियांसोबतच इतरही धर्मीयांच्या भावना जपण्याचा प्रयत्न करून योग्य तो मार्ग काढण्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. रामजन्मभूमीच्या त्या विवादास्पद जागी राममंदिरासोबतच इतर धर्मियांची प्रार्थनास्थळे देखील निर्माण केली जावीत. यावेळी मिटसॉटचे प्रकल्प संचालक डॉ. मिलिंद पांडे, डॉ. सुभाष आवळे, डा. महेश आबाळे उपस्थित होते.