पुणे –
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी ‘एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँण्ड रिसर्च सेंटर’च्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने ‘आंतर महाविद्यालयीन बुक रिव्ह्यूू’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेस विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
प्रचिका सक्सेना (संचालक,कॉनरड, मानव संसाधन विभाग) यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. ही स्पर्धा नुकतीच हायटेक हॉल, आझम कॅम्पस येथे पार पडली.
श्रेयस धनंजय करंजकर (अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज) विद्यार्थ्याने विजेत्या पदाचे पारितोषिक पटकाविले. तर नजाला नवाब (‘एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँण्ड रिसर्च सेंटर’) हीने उपविजेतेपदाचे पारितोषिक मिळविले. सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे पारितोषिकाचे स्वरूप होते.
एम.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार आणि प्राचार्य अनिता फ्रांत्झ (एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँण्ड रिसर्च सेंटर’च्या प्राचार्य) यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. डॉ. समीर दिवाणजी (मलाका स्पाईस चे शिक्षण व्यवस्थापक), डॉ. विद्या कदम (सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी) यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथपाल चंदा सुपेकर यांनी केले.