पुणे –
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ च्या एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँण्ड रिसर्चच्या वतीने आयोजित टी -10 क्रिकेट टूर्नामेंट-2018 मध्ये तसावा ट्रॅव्हल्स कॉर्पोरेशन ला जेतेपदाचा मान मिळाला, अशी माहिती स्पर्धेचे संयोजक विन्सेंट केदारी यांनी दिली.
टी -10 क्रिकेट टूर्नामेंट-2018 चा अंतिम सामना तसावा ट्रॅव्हल्स कॉर्पोरेशन आणि ह्यात पुणे यांच्यात रंगला. ‘हयात पुण’े ला उपविजेते पद मिळाले.
या स्पर्धेचे यंदाचे 10 वे वर्ष होते. ही स्पर्धा आझम कॅम्पस क्रिकेट मैदानावर संपन्न झाली. डॉ. प्रफुल्ल पवार (PUMBA चे विभाग प्रमुख) यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी विक्रम शर्मा (संचालक, द वेस्टर्न पुणे चे मनुष्य बळ विकास विभाग प्रमुख), प्रियांका भोसले (प्रशिक्षक व्यवस्थापक,द वेस्टर्न पुणे ), यामिनी भाकरे (व्यवस्थापक, मनुष्य बळ विकास, हयात पुणे) उपस्थित होते.
चार दिवसीय या क्रिकेट स्पर्धेमध्ये 14 संघ सहभागी झाले होते. यात 9 हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालये आणि 5 हॉटेल उद्योग संस्था सहभागी होत्या.
एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँण्ड रिसर्च, डॉ. डि.वाय.पाटील (बीएचएमसीटी), डॉ. डि.वाय.पाटील (बीएससीएचएस), अजिंक्य डि.वाय.पाटील, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, अम्ब्रोसिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मॅरिओट सुईटस, हयात पुणे, फोर पॉईंट बाय शेराटॉन, अॅम्ब्रोसिया रिसॉर्ट, कोर्टयार्ड बाय मेरिओट हिंजवडी, डॉ. ए.बी.तेलंग इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, तसावा ट्रॅव्हल्स कॉर्पोरेशन या संघांचा समावेश होता.