पुणे: महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँण्ड रिसर्च सेंटर’च्या ‘सॉल्ट’ रेस्टॉरंट चे उद्घाटन आज करण्यात आले .
‘ह्यात पुणे हॉटेल’चे महाव्यवस्थापक सुमीत कुमार यांच्या हस्ते एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयात हा कार्यक्रम झाला.
उदघाटन प्रसंगी किशोर सरपोतदार (पुणे हॉटेलिअर्स असोसिएशन चे सचिव ), मनोहर चासकर (सिनेट सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी), यामिनी बाकरे (ह्यात पुणे हॉटेल मनुष्य बळ विभाग व्यवस्थापक ), एम. सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सचिव लतिफ मगदूम, सह सचिव इरफान शेख, खजिनदार मुझफ्फर शेख, महाविद्यालयाच्या प्राचार्य अनिता फ्रांत्झ हे मान्यवर उपस्थित होते.
हे रेस्टॉरेंट महाविद्यालयाच्या आवारात कायम स्वरूपी असणार आहे. विद्यार्थ्यांना हॉटेल संबधित कामाचा प्रत्यक्ष कार्यानुभव मिळावा या प्रमुख हेतूने हे रेस्टॉरेंट सुरु करण्यात आले असल्याचे प्राचार्य अनिता फ्रांत्झ यांनी सांगितले.
रेस्टॉरंट उद्घाटन कार्यक्रमानंतर ‘एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफहॉटेल मॅनेजमेंट च्या अंतिम वर्ष अभ्यासक्रमा चे विद्यार्थ्यांकडून विशेष जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. या जेवणाची थीम ‘ईट टू द बीट’ होती.