MAH: ‘दगडूशेठ’ चा वासंतिक उटी, मोगरा महोत्सव बुधवारी (दि.४)

April 2nd, 2018 Posted In: Pune Express

Team TNV

पुणे :
 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे बुधवार, दिनांक ४ एप्रिल रोजी मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. गणरायाच्या मूर्तीला व मंदिरावर मोग-याच्या लाखो फुलांची आकर्षक सजावट करण्यात येणार आहे. मोग-याची आरास बुधवारी सायंकाळी ६ नंतर गणेशभक्तांना पाहण्याकरीता खुली राहणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली. 
 गणेश मंदिराचा संपूर्ण गाभारा, मंदिर परिसर व मंदिराच्या कळसावर मोग-यासह विविध रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात येणार आहे. याशिवाय गणेशाच्या मूर्तीला फुलांचा मुकुट, वस्त्र, आभूषणे ही देखील मोगरा व इतर फुलांनी साकारण्यात येणार आहेत. मोगरा महोत्सवानंतर रात्री ९ वाजता अखिल भारतीय वारकरी भजनी मंडळाचे उटीचे भजन देखील होणार आहे. 
अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवार, दिनांक ३ एप्रिल रोजी पहाटे ४ ते ६ यावेळेत प्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायन ही स्वराभिषेक या कार्यक्रमाद्वारे गायनसेवा अर्पण करणार आहे. त्यानंतर सकाळी ८ ते दुपारी १२ यावेळेत गणेशयाग आयोजित करण्यात आला आहे. अंगारकी चतुर्थीनिमित्त मंदिर पहाटे ३ वाजल्यापासून भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे. तरी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. 

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions