पुणे – महिंद्र अँड महिंद्र लि. ने एसएईइंडिया या ऑटोमोटिव्ह इंजिनियर्ससाठी असलेल्या व्यावसायिक संघटनेच्या सहकार्याने आज बहुप्रतिक्षित बाहा मालिकेच्या अकराव्या आवृत्तीचा प्रारंभ होत असल्याचे जाहीर केले. या आवृत्तीची अंतिमफेरी इंदौरजवळील पितमपूर येथील नॅट्रिप सुविधा केंद्रात 24 ते 28 जानेवारी 2018 दरम्यान होणार असून त्यानंतर आयआयटी रोपार येथे 8 ते 11 मार्च 2018 दरम्यान पार पडणार आहे.
बाहा एसएईइंडिया 2017 साठी एकूण 388 प्रवेशिका आल्या होत्या, ज्यामधील 180 संघांची पारंपरिक बाजासाठी निवड करण्यात आली, तर 41 संघ ईबाजासाठी व्हर्च्युअल फेरीतून निवडण्यात आले.
बाहा एसएईइंडियाने विद्यार्थ्यांना तीन दिवस चालणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या मालिकेत सहभागी होण्यासाठी एकच सीट असलेल्या चार चाकी ऑल- टेरेन व्हेइकलची (एटीव्ही) संकल्पना, बांधणी, चाचणी आणि अधिकृतता इत्यादी तयार करायला सांगितले होते. या तीन दिवसीय कार्यक्रमात तांत्रित तपासणी, स्टॅटिक विश्लेषण उदा. डिझाइन, खर्च आणि विक्री साजरीकरण तसेच डायनॅमिक इव्हेंट्स उदा. अक्सलरेशन, स्लेज पुल, सस्पेंशन- ट्रॅक्शन आणि गतीशीलता यांचा समावेश असेल.
बाहा एसएईइंडियाचे उल्लेखनीय, अभिनव वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये दरवर्षी नव्या संकल्पनेचा अवलंब केला जातो. यावर्षी बाहा 2018 ची संकल्पना ‘ग्राउंड टु ग्लोरी’ ही असून ती शून्यापासून सुरुवात करत वर्षभर संघर्ष आपले स्वप्न पूर्णत्वाला नेणाऱ्या उदयोन्मुख इंजिनियर्सची तळमळ, मेहनत, चिकाटी साजरी करणारी आहे. ही संकल्पना विद्यार्थ्यांच्या आव्हानावर मात करून यश मिळवण्याच्या वृत्तीला सलाम करणारी आहे. ही संकल्पना विद्यार्थ्यांचा प्रवास आणि त्यांच्याकडून प्रत्येक सीमेला दिले जाणारे आव्हान यांचे प्रतीक असून त्यामुळे बाहा हा कार्यक्रम त्याच्याशी संबंधित असलेल्या सर्व लोकांना यश प्रदान करणारी आहे.
बाहा एसएईइंडियाने 2015 मध्ये भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी ईबाहा मालिका सुरू केली. एमबाहा गाड्या 10 एचपी आणि बी अँड एस गॅसोलिन इंजिन जे सर्व 180 संघांसाठी सारखेच असते त्यावर चालते, तर ईबाहा गाड्या इलेक्ट्रिक मोटर आणि चार्ज करण्यायोग्य लिथियम- इयॉन बॅटरीद्वारे विजेवर चालतात.
बाहा 2018 मध्ये पुण्यातील 25 महाविद्यालयांनी सहभाग घेतला असून त्यातील महाराष्ट्रातील 64 प्रवेशिका अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या आहेत. बाहा मालिकेच्या गेल्या काही आवृत्त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रवेशिक पुणे शहरातील होत्या. पुण्यातील महाविद्यालयांनी गेल्या काही वर्षांत अंतिम फेरीत सर्वाधिक बक्षिसेही मिळवली आहेत. बाहा 2017 मध्ये प्रतिष्ठित बक्षिस कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणेने व त्याखालोखाल पुण्यातीलच अलार्ड कॉलेज ऑफ इंजिनियरिंगने बक्षिस मिळवले होते. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणेला ‘बेस्ट ईबाहा टीम’ पुरस्काराचे विजेते घोषित करण्यात आले होते.
बाहा पुरस्कारासाठी देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांचे जुलै 2017 मध्ये चित्कारा विद्यापीठ, चंडीगढ येथे झालेल्या व्हर्च्युअल फेरीत चाचणीत परीक्षण करण्यात आले. इथे त्यांनी अंतिम फेरीसाठी बाहा बगी गाडीचे त्यांना इच्छित असलेले डिझाइन दाखल केले.
कॅड डिझाइन, सीएई विश्लेषण, रोल केजचे डिझाइन, सस्पेंशन, स्टिअरिंग आणि ब्रेक्स तसेच रूल बुक व्हायवा सत्र आणि त्यांना आयत्या वेळेस देण्यात आलेल्या विषयाच्या विश्लेषणावरून या संघांची निवड करण्यात आली. व्हर्च्युअल बाहादरम्यान सादर करण्यात आलेल्या प्रवेशिका दिलेल्या सूचना व तपशीलांनुसार बनवण्यात आलेले नमुने होते. अंतिम फेरीतील संघांना त्यांची स्वतःची बगी रेस कार तयार करत आपले वाहन क्षेत्रातील आपले कौशल्य, आकलन आणि तळमळ दाखवून द्यायची होती.
याप्रसंगी पवन गोएंका, व्यवस्थापकीय संचालक, महिंद्र अँड महिंद्र लि. म्हणाले, ‘बाहा एसएईइंडिया 2018 शी नाते जोडताना महिंद्रला आनंद होत आहे. बाजासोबत आम्ही महिंद्रची सतत प्रगती करण्याची विचारसरणी पुढे नेत आहेत. यंदा पितमपूर आणि आयआयटी रोपार या ठिकाणी मिळून दोन बाहा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, ही बाहा एसएईइंडियाची वाढती लोकप्रियता आणि राष्ट्रीय महत्त्व यांची पावती देणारी आहे. यंदा ग्राउंड टु ग्लोरी ही संकल्पना साजरी करत असताना मला आनंद वाटतो, की बाजा एसएईइंडिया हे एक असे व्यासपीठ आहे, जे तरुण इंजिनियरींग गुणवत्तेला वर्गात मिळवलेल्या ज्ञानाच्या जोरावर मशिनरी तयार करत विजय मिळवण्यासाठी संधी देते.’
मुकेश के. तिवारी, आयोजक, बाहा एसएईइंडिया 2018 आणि उप व्यवस्थापक महिंद्र टु व्हीलर्स लि. म्हणाले, ‘ या वर्षी एकंदर सहभाग 2017 मध्ये 18 टक्क्यांनी वाढला आहे, तर एम- बाहा विभागातील सहभागात 33 टक्क्यांची वाढ आहे. एम- बाहासाठी आमच्याकडे 120 संघ, तर पितमपूर आणि आयआयटी- रोपार येथील ई- बाहासाठी 37 संघ आहेत.’