पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात ‘जॉय ऑफ गिव्हिंग’ सप्ताहानिमित्त (2 ते 8 ऑक्टोबर) जागृती फउंडेशनच्या अंध मुलींसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
फाउंडेशनच्या प्रवक्त्या सकिना बेदी यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक व्यक्तिमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरुपात दुर्बलता असते. परंतु ती दिसून येत नाही. अंध व्यक्तिंमधील दुर्बलता प्रकर्षाने समोर येते. ती गोंजारत न बसता जिद्दीने आयुष्य जगण्यास शिकण्याची गरज असल्याचे मत श्रीमती बेदी यांनी व्यक्त केले.
ओमकार धामणकर या अंध विद्यार्थ्याने गीतापठन केले. डॉ. सविता केळकर यांनी बाजा वाजवून दाखविला. महाविद्यालयातील मराठी, हिंदी, संस्कृत, फ्रेंच या भाषा भगिनींचे विद्यार्थी या कार्यक‘मात सहभागी झाले होते.
पर्यवेक्षिका डॉ. सविता केळकर, मराठी विभागाचे प्रमुख प्रा. जगदीश पाटील, हिंदी विभागाच्या प्रा. सुनिता जमदाडे, फ्रेंच विभागाच्या प्रा. पौर्णिमा डोळे, संस्कृत विभागाच्या प्रा. विनया निळखंड यांनी संयोजन केले.