पुणे – केंद्र व राज्यातील भाजपच्या सरकारने अनेक चांगल्या योजना सुरू केल्या आहेत. त्या योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेला घेता यावा यासाठी बूथप्रमुखांनी जनतेशी वैयक्तिक संपर्क वाढवावा असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
पंडीत दीनदयाळ उपाध्याय कार्यविस्तार योजनेअंतर्गत पर्वती विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या बूथप्रमुखांच्या मेळाव्यात श्री. बापट मार्गदर्शन करीत होते. यावेळी बूथप्रमुखांना हजारी यादी व सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण दिले. बापट यांच्या हस्ते बूथप्रमुखांना ओळखपत्र आणि नामफलक
देण्यात आले.
आमदार माधुरी मिसाळ, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री रवी अनासपुरे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, सरचिटणीस दीपक मिसाळ, सभागृह नेते श्रीनाथ भीमाले, नगरसेवक गोपाळ चिंतल, प्रविण चोरबेले, राजू शिळीमकर, श्रीकांत जगताप, रघुनाथ गौडा, महेश वाबळे, मानसी देशपांडे, मंजुषा नागपुरे, स्मिता वस्ते, कविता वैरागे, सरस्वती शेंडगे, अनुसया चव्हाण, अनिता कदम, वर्षा साठे, रुपाली धाडवे, राजश्री शिळीमकर, प्रसन्न जगताप अध्यक्ष हरीष परदेशी, सरचिटणीस जितेंद्र पोळेकर, विस्तारक योगेश बाचल व्यासपीठावर उपस्थित होते.
बापट पुढे म्हणाले, सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जोरावर भाजपने सत्ता संपादन केली आहे. सरकार आणि जनतेतील कार्यकर्ता हा महत्वाचा दुवा आहे. भाजपचा कार्यकर्ता सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम झटत असतो. त्याच्यावर लोकांचा विश्वास असतो. हा विश्वास वृध्दिंगत करण्यासाठी कार्यकर्त्याने नागरिकांच्या अडीअडचणीला धावून गेले पाहिजे. वैयक्तिक संपर्क वाढविला पाहिजे.
शहराध्यक्ष योगेश गोगावले म्हणाले, पंडीत दीनदयाळ उपाध्याय कार्यविस्तार योजनेअंतर्गत शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये बूथप्रमुखांच्या रचना पूर्ण झाल्या आहेत. बूथप्रमुखांच्या माध्यमातून मतदारांशी थेट संपर्क आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी कालबध्द कार्यक‘म आखण्यात आला आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे.
आमदार मिसाळ म्हणाल्या, पर्वती मतदारसंघातील बूथप्रमुखांना ओळखपत्र आणि निवासस्थानावर लावण्यासाठी नामङ्गलक देण्यात आला आहे. त्यामुळे या कार्यकर्त्याला समाजात मान्यता मिळू शकेल. या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी नियोजनबध्द कार्यक‘म निश्चित करण्यात आला आहे. पहिल्या महिन्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना व अपंगांच्या योजनांसाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
रवी अनासपुरे, योगेश बाचल यांची भाषणे झाली. हरिष परदेशी यांनी प्रास्ताविक भाषण केले. जितेंद्र पोळेकर यांनी सूत्रसंचालन केले. दीपक शिरवळकर यांनी आभार मानले.
—–