पुणे :
ग्राहक पेठ तर्फे आयोजन: ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजूमदार यांची उपस्थिती
ग्राहक चळवळीतील भरीव योगदानाबद्दल डॉ. भा.र.साबडे व ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. दादासाहेब बेंद्रे यांना ग्राहक पेठेचा ग्राहक पेठ कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजूमदार यांच्या हस्ते प्रदान करण्यात असून शनिवार, दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता गणेश कला क्रीडा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सूर्यकांत पाठक यांनी दिली.
ग्राहक चळवळीतील भरीव योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. डॉ भा.र. साबडे यांच्या ग्राहक प्रबोधन आणि ग्राहकहित रक्षणाच्या कार्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. दादासाहेब बेंद्रे यांना देखील यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच विशाल चोरडिया आणि भोई प्रतिष्ठानचे मिलींद भोई यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे
पुरस्कार प्रदान सोहळ््यादरम्यान प्रभात ते सैराट या मराठी चित्रपटांच्या सांगीतिक दृक्श्राव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी चैतन्य कुलकर्णी, जितेंद्र अभ्यंकर, स्वरदा गोडबोले, देविका आणि मोहिका दामले यांचे गायन होणार आहे. ऋतुजा इंगळे, ऐश्वर्या काळे, सुमीत गजमल, अभिषेक हावरागी, उत्कर्षा रोकडे यांचे नृत्यसादरीकरण होणार आहे. मिलींद ओक यांची संकल्पना असून, नृत्यदिग्दर्शन कुणाल फडके यांचे आहे.