पुणे :
खराडी येथीलश्री हॉस्पीटलचा डॉक्टर आणि रुग्णांमध्ये थेट संवाद व्हावा यासाठी रुग्णदरबार हा अनोखा उपक्रम
डॉक्टर्स आणि रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक यांच्या मनातील शंकांचे निरसन थेट डॉक्टरांद्वारे व्हावे. रुग्णांच्या मनात असलेल्या प्रश्नांवर मार्गदर्शन मिळावे यासाठी खराडी येथील श्री हॉस्पीटलतर्फे रुग्णांसाठी रुग्णदरबार या अनोख्या उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे. या रुग्णदरबाराचे उद्घाटन मंगळवार दि. २० फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता खराडी येथील श्री हॉस्पिटल येथे पुणे जिल्ह्याचे निवृत्त मुख्य न्यायाधीश सुमंत कोल्हे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती श्री हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीहरी ढोरे पाटील यांनी दिली.
डॉ. श्रीहरी ढोरे पाटील म्हणाले, उद्घाटन प्रसंगी बी. जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. अजय चंदनवाले उपस्थित राहणार आहेत. रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनात आजारांविषयी किंवा वैद्यकीय क्षेत्रातील इतर गोष्टींविषयी अनेक शंका असतात. ब-याचदा रुग्णांच्या मनातील शंका त्यांच्या मनातच राहतात. अशावेळी रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनातील प्रश्नांचे निरसन प्रत्यक्ष डॉक्टरांद्वारे व्हावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम प्रत्येक महिन्याच्या तिस-या मंगळवारी खराडी येथील श्री हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात येणार आहे. उपक्रमात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या उपक्रमाद्वारे डॉक्टर रुग्णांमध्ये थेट संवाद साधला जाणार आहे. तसेच डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील दरी भरून काढण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. रुग्णांमध्ये आजारांविषयी असलेले गैरसमज देखील याद्वारे दूर होणार आहेत.