पुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एजुकेशन सोसायटी’च्या ‘आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालया’च्या ‘मायक्रोबायोलॉजि( सूक्ष्मजीवशास्त्र )’ विभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय
कार्यशाळेचे उदघाटन डॉ. पी. के. ढाकेफाळकर (वैज्ञानिक, आगरकर संशोधन संस्था, पुणे) यांच्या हस्ते शुक्रवारी डॉ ए आर शेख असेम्ब्ली हॉल मध्ये झाले.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शैला बुटवाला यांनी प्रास्ताविक केले. तर मायक्रोबायॉलॉजी विभाग प्रमुख डॉ . देविप्रिया मुजुमदार यांनी कार्यशाळेविषयी माहिती दिली. कार्यशाळा समन्वयक गौरी देवस्थळे यांनी सूत्रसंचालन केले तर अम्रिता भाटिया यांनी आभार मानले.
इंजनिअस ट्रेंड्स इन लाइफ सायन्सेस’ (INGENIOUS TRENDS IN LIFE SCIENCES) या विषयावर ही राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. आज दिनांक ७ ऑक्टोबर रोजी समारोप होणार आहे, अशी माहिती कार्यशाळा समन्वयक गौरी देवस्थळे यांनी दिली.
उदघाटन प्रसंगी बोलताना डॉ. ढाकेफाळकर यांनी प्रयोगशाळा विषयावर भर दिला. ते म्हणाले, ‘विज्ञान आणि संशोधन हे मानवी समाजाच्या उन्नतीसाठी असावे. संशोधनात विविध क्षेत्रात सूक्ष्म जीव वापरले जातात जसे की तेल काढणे प्रक्रिया, जैवइंधन आणि सूक्ष्मजीवाणू इत्यादी. त्यांच्या उपयुक्ततेबद्दल अजून संशोधन व्हावे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहयोगाने ही कार्यशाळा आयोजित केली आहे . भूतलावरील जीवंत प्राणांच्या आणि त्यांची परिसंस्था, पर्यावरणाचे भवितव्य या विषयावर या कार्यशाळेत चर्चा होत आहे. तसेच संशोधनपर निबंध सादर होत आहेत