पुणे – बोट क्लब रस्त्यावरील सेंट फेलिक्स शाळेतील मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. यावेळी दक्षिण कोरीयातील तायक्वांदो खेळाडूंनी प्रात्याक्षिके दाखवित स्वत:चा बचाव कसा करायचा याचे प्रशिक्षण दिले.
यावेळी शाळेच्या प्राध्यापिका सिस्टर तारा, पर्यवेक्षिका लीना पॉल, तायक्वांदोचे प्रशिक्षक प्रोफेसर बाळकृष्ण भंडारी उपस्थित होते. यावेळी पेक चुंग यांग, ली यंग ले, पॅक यांग आणि जिआँगी ली यांनी विद्यार्थीनींना प्रशिक्षण दिले.
प्रशिक्षक बाळकृष्ण भंडारी म्हणाले, आजकाल मुलींसाठी अतिशय भितीचे वातावरण पहायला मिळते. अनेकदा मुली एकट्याच प्रवास करतात. त्यामुळे त्यांनी किमान स्वत:चे रक्षण करावे यासाठी त्यांना तायक्वांदो शिकविण्यासोबतच तज्ञांचे मार्गदर्शन देखील दिले जाते.