पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलमध्ये साईनाथ मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने गो-वत्स पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृष्ण व पेंद्याच्या भूमिकेतील २५ हून अधिक विद्यार्थ्यांनी गाय व वासराची पूजा केली. वासुदेवाच्या भूमिकेतील महादेव जाधव यांनी भारतीय संस्कृतीत गायीचे महत्व विषद केले.आई नंतर आपली भूक जी दुधाने पूर्ण करते ती माता म्हणजे गोमाता ती दूध, दही, ताक, तूप ते औषदि गोमूत्र आपल्या आरोग्य करिता लाभ दायक आहे.
गो म्हणजे इंद्रिय आणि पाल करणारे पालनहार भगवान गोपाल 9 लक्ष गोमाता चे सांभाळ करायचे एवढे गाई आणि वासरू चे आपल्या जीवनात, धर्मात आणि शास्त्रात महत्व आहे. असे वासुदेव ने विद्यार्थ्यांना सांगितले इंग‘जी विद्यार्थी ने प्रथमच गाई चे दुधाच्या धारा पहिल्या त्याच बरोबर गोपाल वेशातील विद्यार्थी स्वतःधार्या पिळ्या मदतीला सोबतीला पेंढ्या देखील होता. 25 गोपाळ आणि पेंढ्या वेशभूषेत विद्यार्थी होते. गाय व कृष्णाचे नाते सांगितले. कृष्ण गायीचे दूध, दही, लोणी, तूप खात होता. गायीचे गोमूत्र औषधी आहे.
विद्यार्थ्यांनी कृष्णाचा आदर्श ठेवून दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करावे. ते पौष्टिक व आरोग्याला लाभदायक आहेत फास्ट फूडपासून दूर राहावे. त्याचे शरीरावर विपरीत परिणाम होत असतात. मुलांनी गायीच्या धारा काढण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. मु‘याध्यापिका स्मिता कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. मंडळाचे अध्यक्ष पीयुष शहा, अनिल दीवाणजी, मधुकर कदम, नंदकुमार ओव्हाळ, संकेत निंबाळकर यांनी संयोजन केले.