
का होतंय स्थलांतर, कोकणी युवकाचं??
चंद्रशेखर तेली प्रत्येक व्यक्तीला आपला व आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करण्यासाठी रोजीरोटीचा प्रश्न सोडविणे गरजेचे असते. त्यासाठी मग जगाच्या पाठीवर कुठेही जायला तो तयार असतो. पोटापाण्याच्या प्रश्नासाठी देशाटन कारण हि काही चुकीची गोष्ट नाही. उलट आपले बुद्धी कौशल्य, अंगभूत क्षमता पुरेपुर वापरून अधिक चांगल्या प्रतीचे उत्पन्न, आर्थिक फायदे मिळविता येतात. हे जरी खरे असले तरी आता जग बदलत चालले आहे. हाताच्या बोटावरच…
READ more..
धो धो पाऊस तरीही .. पाणी पाणी..
टिम “येवा कोकणात” उन्हाळा आला कि कोकणच्या काही भागात पिण्याच्या पाण्यासाठी पळापळ सुरु होते. शेतीतर दूरच राहिली. पावसाचे पाणी साठविण्याची तंत्रशुद्ध व्यवस्था कोकणात नाही. शिवाय कोकणातील झरे, औद्योगिक वापराचं पाणी, जलविद्युत प्रकल्पांचे अवजल, सिंचन व्यवस्था यांचे अचूक व्यवस्थापन साधलं तर कोकणातील पाण्याचा प्रश्न कायमचा सुटू शकतो. कोकणच्या भौगोलिक क्षेत्राचा विचार केल्यास कोकण क्षेत्र सुमारे ३० लाख हेक्टर इतके आहे. यातले…
READ more..
भारत मातेचे “डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरैया”
अनामिका आर. जाधव सहाय्यक अभियंता (वर्ग १, श्रेणी १), सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, कुडाळ सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांचा जन्म दिवस अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचा कर्नाटक राज्यातील कोलार जिल्हयातल्या चिकबळ्ळापूर तालुक्यातील मुद्देनहळ्ळी या गावी १५ सप्टेंबर १८६४ रोजी झाला. सन १९५५ मध्ये त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च सन्मानाणे सन्मानित करण्यात आले. त्यांचे बालपण अत्यंत हलाखीच्या स्थिस्तीत गेले. बाल्यावस्थेत ऐकलेल्या…
READ more..
आधुनिक भारताचे विश्वकर्मा .. ‘सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया’
जी. एस. चव्हाण उप अभियंता, पी.एम.जी.एस.वाय. सिंधुदुर्ग सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. साक्षात विश्वकर्म्याने येथे येऊन स्थापत्य कला सादर करावी अशा प्रकारे सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी आपल्या कौशल्याने अनेकांना भारावून सोडले. त्या काळात कोणताही मोठा प्रकल्प असो विश्वेश्वरय्या यांच्याशिवाय किंबहुना त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय तो पूर्ण होत नसे, आजही त्यांनी घालून दिलेल्या सूत्रांचा वापर अभियांत्रिकी क्षेत्रात केला जात…
READ more..
गौरी लंकेश आणि न्यायाधीशाच्या भूमिकेतले आपण..
नितीन साळुंखे ९३२१८११०९१ पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनानरून उभ्या देशात दोन गट पडले आहेत. एक गट खुनाचं समर्थन छुपं करतो आहे, तर दुसरा गट तेवढ्याच टोकाचा निषेध करून पहिल्या गटाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतो आहे. खुन, मग तो कुणाचाही असो, तो निषेधाहर्यचं असतो. कुणाच्याच खुनाचं समर्थन करता येत नाही. गौरी लंकेश यांच्या खुनाचं समर्थन वा निषेध करणाऱ्यांना गौरी लंकेश व…
READ more..
डांबराच्या बॅरलला पडणारी भोके थांबली नाहीत तर…
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांसी, स.न.वि.वि गोष्ट गत वर्षातली आहे. एक सच्चा दिलाचा हक्काचा मार्गदर्शक आणि कसलीही भीड न बाळगता आपली मत स्पष्ट्पणे मांडणाऱ्या कवी मित्राला आम्ही गमवल. कणकवली पासून ५ कि. मी. वरील जानवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरचा सात फुटी खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या उत्तम पवार याच्या बाइकला समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिली आणि ४८ वर्षांच्या एका समर्पित आयुष्याची अखेर झाली. कणकवली तालुक्यातील…
READ more..
कॉंग्रेसचा राणेंवर भरोसा नाय काय??
कोकणातील जेष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे पक्षांतर करणार या चर्चेला लवकरच पूर्णविराम मिळेल. पितृपक्ष संपताच कोकणात मोठा राजकीय भूकंप घडणार याचे स्पष्ट संकेत नारायण राणे यांनी नुकत्याच घेतलेल्या सिंधुदुर्ग काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या सभेत मिळाले आहेत. या सभेत पहिल्यांदा राणे यांनी आपल्या कोकणी आवाजाला वाट मोकळी करून दिली आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांबाबत वेगवेगळे गौप्यस्फोट केलेत. विशेष म्हणजे…
READ more..
कचरामुक्तीचे धडे देतेय “वेंगुर्ला”
अॅड. शशांक मराठे स्वच्छता आणि कचरामुक्तीच्या बाबतीत वेंगुर्ले शहराने मिळविलेले यश राज्यातच नाही तर राष्ट्रीय पातळीवर देखील मैलाचा दगड ठरले आहे. हागणदारीमुक्ती आणि प्लॅस्टिकमुक्त शहर अशा लौकिकाची देश पातळीवर नोंद घेण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राज्यातील वेंगुर्ले, लोणावळा व शिरुर (जि. पुणे), सांगोला (जि. सोलापूर), देवळाली-प्रवरा (जि. अहमदनगर), उमरेड (जि. नागपूर), कागल, मुरगुड, पन्हाळा (जि. कोल्हापूर), पाचगणी (जि. सातारा)…
READ more..
कॉंग्रेसचा नारायण राणेंना जोरदार धक्का !
कॉंग्रेसचा नारायण राणेंना जोरदार धक्का ! सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेसची कार्यकारिणी बरखास्त काँग्रेसलाही सहन करावा लागणार मोठा फटका अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आज सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. नवे जिल्हाध्यक्ष म्हणून विकास सावंत यांची नियुक्ती करण्यात आली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या जिल्ह्यातील कॉंग्रेस संघटनेतील वर्चस्वाला प्रदेश कॉंग्रेसने दिलेला हा धक्का मानला जात आहे. विद्यमान कॉंग्रेस कार्यकारिणीत बहुसंख्य राणेसमर्थक पदाधिकारी…
READ more..
वरदविनायका चरणी लोकसेवेची पुष्पांजली
महडचे गणपती संस्थान जोपासतेय सामाजिक भावनेचा वसा धार्मिक कर्मकांडांपासून दूर राहत देवस्थानच्या उपक्रमांना सामाजिकतेची जोड देण्याचा वसा घालून दिलाय तो महड येथील वरदविनायक गणपती संस्थानने. महडसारख्या छोटया गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा या देवस्थानाचा मानस आहे आणि तो प्रत्यक्षात आणला जात आहे. काय आहे हे देवस्थान आणि काय आहेत इथले उपक्रम याविषयी सांगताहेत संस्थानचे विश्वस्थ “केदार जोशी”. पेशाने वकील असलेले आणि…
READ more..