पुणे
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात ‘वन नेशन वन इलेक्शन’या विषयावर गटचर्चा आयोजित करण्यात आली आहे. मंगळवार, ता. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. भारत सरकारचे निवृत्त गृह सचिव डॉ. माधव गोडबोले, माजी खासदार तरुण विजय, दैनिक लोकमतचे संपादक विजय बाविस्कर, दैनिक लोकसत्ताचे निवासी संपादक मुकुंद संगोराम सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार सुधीर गाडगीळ समन्वय व सूत्रसंचालन करणार आहेत. महाविद्यालयाच्या विकास समितीचे अध्यक्ष विकास काकतकर यांनी ही माहिती दिली.
