पुणे –
महिलांचे सुरेख कपडे आणि घरातील फर्निचर तयार करण्यासाठी संपूर्ण भारतातील विणकर आणि भरतकाम करणारया गटांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने हॅन्ड्स ऑफ इंडिया कार्य करते. अधिकाधिक लोकांनी यालापाहावे आणि ह्या गटांचे काम ओळखले जावे म्हणून एक भव्य प्रदर्शन दरवर्षी हॅन्ड्स ऑफ इंडिया आयोजित करते.हे भव्य प्रदर्शन यंदा २ मार्च ते ६ मार्च सकाळी ९.३० ते रात्री ८.३० पर्यंत टिळक स्मारक मंदीर येथे सुरू राहील.
२०१० पासुन वायुसेना अधिकारी आणि सॉफ्टवेअर आर्किटेक्ट अश्या दोन बहीणी (माल्यदा गोवर्धन और रम्या रंगचार्या) ह्यासाठी कार्य करत आहेत. ह्या दोघीसंपूर्ण भारतातील घरगुती फर्निचर तयार करणारे आणि विणकाम, हाताने भरतकाम करणार्या गरजू कलाकारांच्या गटांसाठीकार्यरत आहेत. हातमाग, हस्तकला, हस्त-भरतकाम यांच्याकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच छोट्या-छोट्या खेड्यांतील गरीब वगरजू मात्र कलेने समृद्ध अशा लोकांच्या हाताला काम मिळवून द्यावे हा ह्या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.
या भव्य प्रदर्शनात हाताने बनविलेल्या मंगलगिरी, इकत, डोंगुरीया, सिल्क कॉटन, माहेश्वरी, चंदेरी आणि फुलीया यांसारख्यासाड्या, सुरेख हातकाम केलेल्या कुर्ती, सलवार सूट्स, पटियाला, फुलकारी, पट्टीवर्क आणि दुपट्टा, ट्युनिक्स, टॉप्स, ट्राउझर्स,पलाजोस यांसारखे वेस्टर्न वेयरदेखील असतील.
हॅन्ड्स ऑफ इंडियामध्ये १० प्रकारच्या हाताने केलेले भरतकाम पहावयास मिळते ज्यामध्ये पंजाबमधील फुलकारी, चिकण,उत्तर प्रदेशातील पत्तीवर्क आणि आरी, पश्चिम बंगालमधील कांथा आणि इंग्लीश कढ़ाई, बिहारमधील सुजनी, कश्मीरची सुझनी व कर्नाटकाची कसुटी असेल.
त्याचसोबत बदलत्या काळात लोप पावत चाललेली भारताची ही अद्वितीय कला टिकवून ठेवण्याचे हॅन्ड्स ऑफ इंडियाचे प्रयत्न आहेत. आज यंत्रणेच्या मोठ्या वापरामुळे हस्तकला हळूहळू लोप पावत चालल्या आहे ह्या कलांना टिकवुन ठेवण्याचेकार्य हॅन्ड्स अॉफ इंडिया करतो.
